नमस्कार मित्रानो जर आपला मोबाईल हरवला किव्हा चोरी गेला तर आपण खूप चिंता करता आणि अश्या वेळी आपल्याला काय करावे समजत नाही. कारण आपला मोबाईल आपल्याला खूप प्रिय असतो. मोबाईल मध्ये असलेला आपला डेटा खूप महत्वाचा असतो आणि अश्यातच आपला मोबाईल चोरी गेला किंवा हरवला तर आपल्याला खूप त्रास होतो.परंतु मित्रानो चिंता करण्याची काही गरज नाही कारण आज मी आपला मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर तो आपला मोबाईल आपण कसा परत मिळवू शकतो या बद्दल सांगणार आहे.
मित्रानो जर आपण मी सांगितल्या प्रमाणे सर्व procces केली तर नक्कीच आपण आपला मोबाईल परत मिळवू शकतो. तर चला मित्रानो सुरुवात करूया.
मित्रानो या साठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या google क्रोम app वरती जायचे आहे. आणि आपल्याला Search बार मध्ये लिहायचे आहे. Www.ceir.com
हें लिहिल्या नंतर search करायचे आहे.या नंतर आपल्या समोर भरपूर साईट open होतील परतू आपल्याला यामधून सर्वात वरती एक नंबर ला ji साईट दिसेल त्या साईट वरती आपल्याला जायचे आहे. जसे खाली दाखवले आहे.
मित्रानो या नंतर आपल्याला CEIR या वरती जायचे आहे. त्या नंतर आपल्या समोर खालील प्रमाणे एंटरफेस दिसून येईल ज्या मध्ये तुम्हाला काही पर्याय दिसून येतील जसे.1) Block Stolen /Lost Mobile
2) Un-Block Found Mobile
3) Check Request Status
मित्रानो या पर्यायामधून आपल्याला एक नंबर असलेला Block Stolen /Lost Mobile हा पर्याय निवडायचा आहे.
या नंतर आपल्या समोर एक form open होईल जसे खाली दिले आहे. ज्या मध्ये तुम्हाला तुमच्या हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईल ची काही माहिती भरावी लागेल जसे.
1) मोबाईल नंबर -1
2) मोबाईल नंबर -2
3) IMEI -1
4) IMEI-2
5) Device ब्रँड
6) Device मॉडेल
मित्रानो या मध्ये आपल्या हरवलेल्या मोबाईल मध्ये असणारे सिम नंबर म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचे आहे.त्या नंतर आपल्याला आपल्या हरवलेल्या मोबाईल चे IMEI नंबर फॉर्म मध्ये टाकायचे आहे. मित्रानो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल चे दोन्ही IMEI नंबर टाकायचे आहे. आपल्याला हें IMEI नंबर आपल्या मोबाईल च्या बॉक्स वरती किव्हा मोबाईल खरेदी करताना दिलेल्या बिलामध्ये भेटून जाईल.
मित्रानो या नंतर आपल्याला आपल्या मोबाईल चा ब्रँड निवडायचा आहे. त्याच बरोबर आपल्या मोबाईल चा मॉडेल निवडायचे आहे.
मित्रानो या नंतर आपल्याला आपल्या हरवलेल्या मोबाईल चे बिल खाली जोडायचे आहे. त्या नंतर तुम्हाला आपला मोबाईल कुठे हरवला.कोणत्या ठिकाणी हरवला कोणत्या राज्यात हरवला कोणत्या जिल्ह्यात हरवला त्याच बरोबर जवळील पोलीस ठाणे निवडायचे आहे.
मित्रानो लक्ष्यात घ्या कि हें सर्व करण्या अगोदर आपल्याला आपल्या मोबाईल हरवल्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाण्यामध्ये करायची आहे. तक्रार नोंदवल्या नंतर आपल्याला जी कॉपी दिली जाईल ती शेवटी जोडायची आहे. जसे खाली दिले आहे.
मित्रानो या नंतर आपल्याला आपल्या स्वतःची माहिती भरायची आहे जसे मोबाईल कुणाच्या नावावरती आहे.त्या नंतर संपूर्ण पत्ता जो आपण मोबाईल घेते वेळी दिला होता. त्या नंतर आपल्याला आपली ओळख देण्यासाठी आपले कोणतेही एक identity पुरावा द्यावा लागेल. जसेआधार
मतदान कार्ड
PAN कार्ड
पासपोर्ट
या नंतर आपल्याला आपल्या identity चा नंबर खाली टाकायचा आहे. जसे आपण आधार कार्ड निवडले तर आपला आधार नंबर खाली टाकायचा आहे जसे.1234 5678 9090 नंतर आपण जे काही identity म्हणून निवडले त्याचा फोटो खाली जोडायचा आहे जसे फॉर्म मध्ये दिले आहे.
या नंतर आपल्याला खाली एक चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे ज्या वरती तुम्हाला एक OTP प्राप्त होईल हा otp टाकल्या नंतर आपल्याला submit या बटणावर क्लिक करायचे आहे. अश्या प्रकारे आपली मोबाईल हरवल्याची तक्रार जमा होईल.मित्रानो अधिकच्या माहिती साठी आपण आमच्या खालील व्हिडिओ ला पाहू शकता.

0 टिप्पण्या